आयुष शिंदे राज्यात प्रथम

| अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे जानेवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत अलिबागच्या चिंतामणवराव केळकर विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी आयुष दत्तात्रय शिंदे याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 22 जानेवारी 2023 रोजी इयत्ता चौथीची प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत आयुष शिंदे यांने 300 पैकी 264 गुण मिळवले. चिंतामणराव केळकर विद्यालयातर्फे आयुष शिंदे याचा बुधवारी (दि. 29) शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यक्ष अमर वार्डे, भावना केळकर, सीमा पाटील, योगेश मगर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या वतीने आयुषाला दहा हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.

Exit mobile version