नांदगाव येथे काँग्रेसतर्फे आझादी गौरव यात्रा

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुका काँग्रेस कमिटीअंतर्गत काढण्यात आलेल्या मुरुड ते नांदगाव आझादी गौरव पदयात्रेला नांदगावमध्ये मोठा प्रतिसाद लाभला.

मुरुडच्या लक्ष्मीखार येथून निघालेल्या या पदयात्रेची सांगता नांदगावचे माजी सरपंच मुअज्जम हसवारे यांच्या निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमाने करण्यात आली. नांदगाव मराठी शाळेच्या पटांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करुन बाजारपेठ परीसरात भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, भारतीय लोकशाही चिरायू होवो,जय जवान जय किसान,वंदे मातरम् आदी घोषणांनी कॉग्रेस कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडला.

पदयात्रेत प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रविण ठाकुर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर.ज्येष्ठ नेते इस्माईल घोले, सुनिल तळे, तालुकाध्यक्ष सुभाष महाडिक, उपसरपंच अस्लम हलडे, तालुका उपाध्यक्ष सुदेश वाणी, प्रीतम पाटील, वासंती उमरोटकर, डॉ.विश्‍वास चव्हाण, दर्शन काळेबेरे, उमेश ठाकूर, इस्माईल शेख, निजामुद्दीन अंधारे,सलिम हलडे आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Exit mobile version