खा.भामरे यांचे प्रशंसोद्गार ; ए.टी.पाटील यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली पाहिजे : खासदार, सुभाष भांमरे
पेण प्रतिनिधी
कर्मयोगी खासदार बॅ ए.टी.पाटील हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते.त्यांच्या कार्याची ओळख अवघ्या महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन खा.सुभाष भामरे यांनी गुरुवारी ( 31 ऑगस्ट) पेण येथे केले. पाटील जन्मशताब्दी निमित्त पेण येथील आगरी समाज हॉल येथे ए.टी.पाटील विचार मंचातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेली ते बोलत होते. या कार्यक्रमास खा.सुनील तटकरे, आ.रवी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.भामरे यांनी आपल्या भाषणातून ए.टी.पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. .पाटील साहेब हे केवढे महान होते. त्यांच्या कार्याची उंची केवढी आहे. हे फक्त या भागातील जनतेला माहित आहे. मात्र असे चालणार नाही त्यांच्या कार्याची उंची आणि त्यांचे व्यक्तीमत्व संपूर्ण महाराष्ट्राला समजणे व महाराष्ट्राला त्याची ओळख असणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त विशेष अंक काढून चालणार नाही तर एक मोठे पुस्तक लिहिणे गरजेचे आहे.असे ते म्हणाले.
पाटील यांचे चारित्र, चरित्र असे आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा एक विषय असू शकतो. जर पुस्तक काढले तर तरुण पिढीला ए.टी.पाटील यांची ओळख होईल आणि त्या कामी मी जरी इथला नसलो तरी जी मदत माझी लागेल ती मदत मी करायला तयार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पुढे डॉ.भांमरे यांनी सांगितले की, बॅ.ए.टी.पाटील यांच्या सारखी माणस राजकारणात असतील तर समाज कारणात त्याचा योगदान नक्कीच मोलाचा असेल. आज ओ.बी.सी आरक्षण ही ए.टी.पाटील यांनी दिलेली आगरी समाजाला मोलाची देण आहे. त्याचप्रमाणे खारलँडच्यासाठी जो कायदा केला त्याच्यासाठी देखील मोलाचे योगदान आहे.असे ते म्हणाले.
माझ्यादृष्टीने खारलँड हा विषय जरी नवीन असला तरी, त्यांनी केलेले काम मोलाचेचे आहे. आणि खारलँडच्या दृष्टीने नवीन काही योजने बदल करायचे असले अथवा निधी उपलब्ध करायची असली तरी आपण थेट पंतप्रधानांशी चर्चा करु आपले शिष्टमंडळ घेउन दिल्लीत या.
खासदार सुभाष भामरे
यावेळी आमदार रवीशेठ पाटील ,खा. सुनील तटकरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तर ए.टी. पाटील यांचे चिरंजीव डॉ. सिध्दार्थ पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.







