बी.एल. पाटील तंत्रनिकेतनमध्ये लसीकरण सुरू

खोपोली | प्रतिनिधी |
बी.एल. पाटील तंत्रनिकेतन व आरोग्य विभाग खोपोली नगरपरिषद तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑक्टोबर रोजी मिशन कोव्हिड लसीकरण विद्यार्थ्यांसाठी संपन्न झाले.
मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत युवा कोव्हिड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ बी.एल. पाटील तंत्रनिकेतन अध्यक्ष जितेश ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. संगीता वानखेडे, डॉ. कोठारी मॅडम व त्यांचे सहकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत प्रा. प्रशांत माने यांनी केले. यावेळी लसीकरण मोहिमेत सहभागी होत विद्यार्थ्यांनी लस घेतल्याबद्दल आभार व्यक्त करीत हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता के.टी.एस. मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील व कार्यवाह किशोर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे प्रा. माने यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. अविनाश मोरे, प्रा. लोमेश जंगम, प्रा. कुणाल पाटील तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख शिवाजी मुरादे यांनी केले.

Exit mobile version