| आगरदांडा | प्रतिनिधी |
पाच कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणार्या सुपारी संघाच्या मुख्य कार्यालयात सहाय्य्क निबंधक श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुरुड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. विरोधी गटाने कोणताही अर्ज सादर न केल्याने सदरची निवडणूक बिनविरोध म्हणून जाहीर करण्यात आली. विरोधी गटाकडून निवडून आलेले डॉ. अमित बेनकर यांनी या निवडीसाठी सूचक म्हणून त्यांनी शिफारस केली. यावेळी सर्व मान्यवरांकडून त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
कोणताही अर्ज न आल्याने सहाय्य्क निंबंधक श्रीकांत पाटील यांनी चेरमन म्हणून बाबा दांडेकर व उपाध्यक्ष म्हणून मोअज्जम हसवारे यांची निवड जाहीर केली. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस मनोज भगत यांनी मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचित चेरअमन बाबा दांडेकर यांनी सांगितले की, सुपारी संघात काम करणार्या सर्व कामगारांना योग्य न्याय मिळवून देणार आहे.त्यांच्या आरोग्याचीसुद्धा काळजी आगामी काळात घेतली जाणार आहे. वेतनवृद्धीवरसुद्धा विचार केला जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित उपाध्यक्ष मोअज्जम हसवारे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सुपारी संघाचे संचालक प्रवीण चौलकर अमोल उपाध्ये, अविनाश भगत, आण्णा कंधारे, विनोद भगत, प्रकाश रणदिवे, हिफाजूरहेमान शेख, विकास दिवेकर, हाफिज कबले, रामजी वणे, डॉ. अमित बेनकर, भाग्यश्री बेलोसे, आसिया घलटे, राजेंद्र गुरव, नरेश पाटील, अॅड. इस्माईल घोले, फैरोज घलटे, शेकाप तालुका चिटणीस अजित कासार, मुरुड शहर अध्यक्ष भाजप उमेश माळी, सुधीर पाटील,चॅरटेड अकाऊंटंट अशोक जोशी, विजय पैर, बाळा गुरव, नितीन पवार, राजेंद्र पोतनिस, उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, इस्माईल शेख, सचिन पाटील, अॅड. मृणाल खोत, प्रमिला माळी, माजी सभापती चंद्रकांत कमाने आदी मान्यवर उपस्थित होते.






