बबन भौड दक्षता समिती अध्यक्षदी

। तळे । वार्ताहर ।
पढवण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बबन गणपत भौड यांची तळा तालुका दक्षता समिती अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. तसे मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी पत्राद्वारे त्यांना कळविले आहे श्री बबन भौड हे गेली 15 वर्षे पढवणचे पोलीस पाटील म्हणून काम करीत होते. त्या काळात गावात कशी शांतता राहील हे पाहताना तंटामुक्त गाव या शासनाच्या उपक्रमात सहभाग. तळे तालुका कुणबी समाज ग्रुप नंबर 5 चे गेली 25 वर्षे सचिव तर आज अध्यक्ष म्हणून 5 वर्षे उत्तम काम करीत आहेत.

Exit mobile version