| नवी दिल्ली | प्रतिनिधी|
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने एकदिवसीय सामन्यांत केवळ 97 डावांत सर्वात जलद पाच हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. बाबरच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हाशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने 101 डावात 5000 धावा पूर्ण केल्या. बाबर आता या यादीत पहिल्या स्थानावर आहे, तर हाशिम आमला दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्सने आणि विराट कोहली 114 डावांसह चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आता या यादीत 115 डावांसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.