। पनवेल । प्रतिनिधी ।
ज्या पद्धतीने आबासाहेबांनी सांगोला मतदारसंघातील गोरगरीब जनतेसोबत नातं जोडलं, कुटुंब म्हणून त्यांना सांभाळलं, त्याचपद्धतीने आपण जर भविष्य काळामध्ये आपल्या मतदारसंघात, आपल्या गावातल्या, पंचायती, जिल्हा परिषदेमधील कार्यकर्त्यांवरती प्रेम केले, त्यापद्धतीने नाते जोडले, तर निश्चितपणे भविष्यकाळ हा शेतकरी कामगार पक्षाचा या रायगड जिल्ह्यामध्ये दिसेल, असा विश्वास सांगोला मतदारसंघाचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यास उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जात त्यांची कामे करण्याचे आवाहन केले.






