उरणमध्ये बाळ सुरक्षा अभियान

राबविण्याची नागरिकांची
| उरण । वार्ताहर ।
तालुक्यातील वाढत्या प्रदूषणामुळे आणि वातावरणातील बदलामुळे सध्या लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला, दमा सारख्या आजारांनी ग्रामले आहे. सदर लहान मुल हे आपल्या आई- वडिलांबरोबर खासगी, शासकीय रुग्णालयात उपचार करुन घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे उरण मध्ये बाळ सुरक्षा अभियान राबविण्याची गरज असल्याची पालकवर्ग करीत आहेत.

तालुक्याच औद्योगिकीकरण व नागरीकरण झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे अशा वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तालुक्यात दिवसेंदिवस प्रदुषणात ही वाढ होत आहे. त्यातच दिवसा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढत असून रात्री हवेत गारवा निर्माण होत असल्याने अशा वातावरणातील बदलामुळे सध्या लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला, दमा सारख्या आजारांची लक्षणे दिसू लागली आहेत. परिषद आरोग्य विभाग, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली यांनी तालुक्यात बाळ सुरक्षा अभियान राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी केली आहे.

सदर रुणांना औषध उपलब्ध करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथील डॉक्टर तसेच गाव पातळीवरील उप केंद्रातील परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मोहीम राबवित आहेत.तरी पालकांनी घाबरून न जाता लहान मुलाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच त्या रुग्णांवर उपचार करून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.सुनिली प्रधान यांनी केले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथील रुग्णालयात दिवसात 10 ते लहान रुग्ण हे तपासणी करून घेण्यासाठी येत आहेत. – डॉ. साहिल मोकल, प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली

Exit mobile version