बनावट सोने गहाण ठेऊन बँकेची फसवणूक

18 जणांवर गुन्हे दाखल
| महाड | प्रतिनिधी |
सोन्याचे मुल्यांकन करणार्‍या सोनाराशी संगनमत करुन आरोपींनी महाड शहरांतील कर्नल आर.डी.निकम सैनिक सहकारी बँकेमध्ये बनावट सोने गहाण ठेऊन त्या बदल्यांत 17 लाख 45 हजार रुपये बॅकेतून घेतले.या अपहार प्रकरणी 18 जणांवर गुन्हा दाखल करण्ंयात आला आहे.

महाड मधील कर्नल आर.डी.निकम सैनिक सहकारी बॅकेमध्ये 31 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या सोने तपासणी मध्ये बनावट सोने गहाण ठेऊन आर्थिक व्यवहार करण्ंयात आले असल्याचे निष्पन्न झाले होते. या मध्ये बॅकेचा सोने मुल्यांकन करणारा सराफ सुधाकर सागवेकर याच्याशी संगनमत करुन बनावट सोने बॅकेमध्ये गहाण ठेवण्ंयात आले होते.या प्रकरणी बॅकेने 17 लाख 45 हजार 091 रुपयाचा अपहार करण्ंयात आले असल्याची तक्रार 12 मार्च रोजी महाड शहर पोलिसांकडे केली. पोलिसांनी सुधाकर विठोबा सागवेकर, ऋतुजा राजेंद्र जाधव, राजेंद्र किसन जाधव, रंजित हरिश्‍चंद्र जाधव, रेवती रंजित जाधव, संजना समिर निगडेकर, संध्या संजय टेंभे, प्राची महेश आर्ते, सुशिला लक्ष्मण भिंगारे, वैभव बंडू धर्माधिकारी, महेश तुकाराम घरटकर, अशोक सोनु नगरकर, शिल्पा अशोक नगरकर, अक्षय मंगेश बामणे, जतीन मनोहर पवार, श्‍वेता श्रीरंग पालांडे, भुपेंद्र विठोबा पवार सर्व राहाणा महाड, यांच्या विरोधांमध्ये भादवी 408, 420, 465, 467, 468, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्ंयता आला आहे.

Exit mobile version