पावसाळ्यात होणार प्रवाशांचे हाल
उरण | वार्ताहर |
दास्तान फाटा ते दिघोडे फाटा या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण ने मागील महिन्यात हाती घेतले. परंतु चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील चिर्ले बस स्थानक जवळील अर्धा कि.मी.रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने प्रवाशी नागरीकांना खड्डे युक्त धूळीतून मार्गक्रमण करावा लागत आहे.सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण ने हाती न घेतल्यास पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होणार आहेत, अशी भिंती सामाजिक कार्यकर्ते समिर पाटील यांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी जेएनपीए बंदर,एन एच फोर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग उरण हे सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग उरण ने मागील पाच महिन्यांपूर्वी दास्तान फाटा ते दिघोडे फाटा या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील चिर्ले बस स्थानक जवळील अर्धा कि.मी.रस़्यावरील डांबर खडी उकडल्याने प्रवाशी नागरीकांना खड्डे युक्त धूळीतून मार्गक्रमण करावा लागत आहे.
चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत.याची पाहणी करून लवकरात लवकर सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभाग उरण कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
पावसाला सुरु होण्यास वीस दिवसांचा कालावधी आहे. तत्पुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. नागरीकांना पावसाळ्यात रस्त्यावरील मोठं मोठाल्या खड्ड्यातून मार्गक्रमण करावा लागणार आहे. तरी अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.
– सुधाकर पाटील
सरपंच चिर्ले ग्रामपंचायत