खालापूरात भागातील रस्त्याची दुरवस्था

| पाताळगंगा । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था इतकी बिकट बनली आहे, त्यामुळे वाहन चालकांसह पादचारी प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे आहे. तालुक्यातील घोडीवली फाटा मार्गे घोडीवली गाव-नावंढे-केळवली-वणी-बीड-जांबरुंग-खरवई-डोळवली रस्ता मोठ्या प्रमाणावर खड्ड्याच्या विळख्यात सापडल्याने या मार्गावरून प्रवास करताना कसरत करावी लागते.

रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे खड्डी, माती रस्त्यावर पसरत असल्यामुळे धुळीच्या समवेत वहान घसरण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दररोज कुठेना कुठे तरी छोटे-मोठे अपघात घडत आहे. रस्त्याची दुरुस्ती लवकरात व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला निवेदन देत रस्ता लवकरात लवकर खड्डेमुक्त करावी अशी मागणी केली.

खड्डेमय रस्त्यामुळे अनेकांना शारीरिक दुखापती बरोबर आर्थिक स्वरूपात भूदंड सोसावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत विशिष्ट निधी उपलब्ध करून दयावा, जेणेकरून रस्ता खड्डेमुक्त होईल. – अक्षय दिसले

रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकावण्याच्या नादात अनेकांना दुखापत होत यामुळे भविष्यात कोणालाही दुखापत होऊ नये म्हणून संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा मार्ग खड्डेमुक्त बनवावा, जेणेकरून सर्वाचा प्रवास सुखाचा बनेल. – रामदास फावडे, बीडखुर्द ग्रामस्थ

Exit mobile version