करंजा बंदराकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील करंजा बंदर ते भेंडखळ खाडी किनारा रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे पडल्याने वाहन चालकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागत आहे. तरी प्रशासनाने सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगेश थळी यांनी केली आहे.

करंजा परिसरातील सर्रास रहिवासी हे द्रोणागिरी नोड, नवी मुंबई, पनवेल, उरण, पेण तसेच पुर्व विभागातील गावात कंटेनर यार्डमध्ये ये- जा करण्यासाठी सिडकोने नव्याने निर्माण केलेल्या करंजा बंदर ते भेंडखळ खाडी किनारा या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे नागरीकांचा वेळ, पैसा ही वाचत आहे. परंतु या रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे पडल्याने वाहन चालकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करावा लागत आहे. त्यातच परतीच्या पावसात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने मोटारसायकलस्वारांना अपघाताचा व प्रवासी नागरीकांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे.

Exit mobile version