कळंबोली शहरातील रस्त्यांची दुरवस्था

नादुरुस्त रस्त्यांमुळे नागरिक हैराण

| पनवेल | वार्ताहर |

कळंबोली शहरातील रस्त्यांची सध्या दयनीय अवस्था झालेली आहे. शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे व खराब रस्ते झाल्याने कळंबोलीतील नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांमुळे रहिवासी त्रस्त झाले असून, दुचाकीस्वारांना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

कळंबोली शहरातील केएलइ कॉलेजजवळून कामोठे शहराकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ मोठी खडी टाकून रस्ता करण्यात आलेला आहे. या रस्त्यावर डांबरीकरण नसल्याने दुचाकी स्लीप झाल्यानांतर गंभीर दुखापतीला समोरे जावे लागत आहे. तेथील रहिवासी सध्या या खड्डेमय रस्त्याच्या त्रासापासून हैराण झालेलं असून, याठिकाणी डांबरीकरण करून हा रस्ता लवकरता लवकर दुरुस्त करण्याची मागणी करत आहेत.

शहरात असलेल्या रस्त्यांवर मलम पट्टी केली जाते, मात्र तात्पुरत्या स्वरुपाची केली जाणार्‍या या कामामुळे मोठ्या गैरसोय वारंवार उद्भवत आहेत. या ठिकाणी असलेल्या रस्त्यांचे वारंवार डागडुजीच्या नावावर थातूर मातुर कामे केली जातात, मात्र कोणत्याही प्रकारे नागरिकांच्या गैरसोयी दूर होत नसल्याने मोठ्या अडचणींना नागरिक तोंड देत असतात. प्रशासनाने लक्ष देऊन संपूर्न कळंबोली शहरातील रस्त्यांची पाहणी करून चांगल्या दर्ज्याच्या ठेकेदारांकडून कामे करून घेणे गरजेचे आहे, असे रहिवासियांचे म्हणणे आहे.

Exit mobile version