महामार्गाची दुरवस्था! सोशल मिडियावर टीका, संताप आणि मिम्सचा पाऊस

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचे पडसाद आता सोशल मिडियावरही जोरात उमटू लागले आहेत. नेटकर्‍यांनी आपला संताप टीका आणि मिम्सद्वारे व्यक्त करीत सरकारला जाब विचारला आहे. मागील 8 ते 10 वर्षांपासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्याचे काम आजतागायत परिपूर्ण झाले नाही. त्यातच या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पेण ते इंदापूर मार्ग तर अधिकच खडतर आहे. त्यामुळे स्थानिक व कोकणवासी आपल्या भावना, संताप व आक्रोश सोशल मीडियावर मिश्किलपणे मांडत आहेत.

सामान्यांनी आपला आक्रोश कुठे व्यक्त करावा तर मग फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप व ट्विटर हे हक्काचे व्यासपीठ. त्यामुळे सामान्य नागरिक आता सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकद्वारे महामार्गच्या परिस्थितीवर मार्मिक टीका व भाष्य करुन लक्ष वेधत आहेत. फोटो शेअर करत आहेत. तसेच सरकारवरदेखील नाराजी व्यक्त करीत आहेत. या टीका व जोक्स गंमतीशीर वाटत असल्या तरी सर्वांनाच विचार करायला लावणार्‍या आहेत. याबाबत शासनाने आत्मपरीक्षण करुन आता तरी हा मार्ग लवकर सुस्थितीत करावा, असेच अनेकांचे गार्‍हाणे आहे. कोकणाला जोडणारा हा महत्वपुर्ण महामार्ग शासनाने लवकर पुर्ण करावा, ही मागणी हतबल झालेले सामान्य नागरीक सोशल मीडियावर करत आहे.

1) मुख्यमंत्र्यांना विनंती- हायवे रस्त्यावर वाहन चालवणे याला साहसी खेळाचा दर्जा द्यावा. सोबत नोकरीत 5% आरक्षण आणि 10 लाखांचा इन्श्युरन्स. गोविंदा तर वर्षातून एकदाच येतो. आम्ही तर या स्पर्धेत वर्षाचे 365 दिवस नेहमीच भाग घेतो. असतो.
2) 75 वर्षे स्वातंत्र्याची, पहा अवस्था महामार्गाची!
3) कृपया लक्ष द्या! चाकरमान्यांनी येताना एक अतिरिक्त मणका आणावा. तसेच जमल्यास सोबत 2-3 पोती सिमेंट व रेती आणावी. तरच आपला प्रवास सुखकर होईल.
4) महामार्गाचा राष्ट्रीय दर्जा काढून टाकून पायवाट म्हणून जाहीर करा; नाहीतर कोकणातल्या माणसांना जनावरे म्हणून घोषित करा. टीप-असा रस्ता जनावरांच्यापण नशिबी नको.
5) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत मुंबई-गोवा हायवे रांगो
ळीला प्रथम क्रमांक

Exit mobile version