बोर्लीस्टँड ते मांडला रस्त्याची दुरावस्था

Exif_JPEG_420

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
| कोर्लई । वार्ताहर ।
साळाव-मुरुड रस्त्यावरील बोर्ली स्टँड ते मांडला या रस्त्यावर पावसाळ्यात पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण ठरत असून याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या असलेल्या दुर्लक्षाबाबत पंचक्रोशीतून तीव्र नाराजी व्यक्तहोत आहे. पावसाच्या सुरुवातीलाच मागील महिन्यात दुसर्‍या आठवड्यानंतर पडलेल्या पावसामुळे तसेच गेली चार पाच दिवस पडत असलेल्या दमदार पावसाने या रस्त्याची पार दुरावस्था झाली असून खड्यांचे प्रमाण वाढले असून रस्त्यावर सातत्याने वाहनांची वर्दळ असल्याने वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी खड्यांमुळे अनेक वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने यात लक्ष पुरवून बोर्ली स्टँड ते मांडला रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी पंचक्रोशीतून होत आहे.

Exit mobile version