उंटांच्या वास्तव्यामुळे दुर्गंधी

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यालगत असलेल्या मठाच्या स्मशानभूमी जवळ उंटाची सवारी करण्यासाठी आणलेल्या उंटांंच्या वास्तव्यामुळे व विष्ठेमुळे सदर परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्मशानभूमीच्या बाजूलाच असलेल्या जागेवर सदरचे उंट दिवसभर बांधून ठेवलेले असतात. उंट आपली विष्ठा त्याच ठिकाणी टाकत असल्यामुळे सदर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदरचे उंट ज्या ठिकाणी रस्त्यावर बांधलेले असतात तेथून काही अंतरावरती अवधूत मंदिर आहे. या अवधूत मंदिराच्या आवारामध्ये दशक्रिया व पिंडदान विधी करण्यात येतात. अनेक वेळा श्रीवर्धन समुद्रकिनारी येणारे पर्यटक, सहलीच्या बसेस या परिसरात जेवण देखील बनवत असल्याने दिवस कार्यासाठी येणार्‍या नागरिकांना अडचणीचे होत आहे. तरी नगर परिषदेने सदर अवधूत मंदिर परिसराची स्वच्छता करावी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version