| पनवेल | वार्ताहर |
रेल्वे प्रवासादरम्यान एका महिलेची पडलेली बॅग रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित महिलेला परत मिळाली आहे. ठाणे ते पनवेल असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या पूनम श्रीवास्तव (56) रेल्वेच्या दरवाजात उभ्या असताना मानसरोवर स्थानकात फलाटावर त्यांची बॅग पडली. त्याबाबत पनवेल स्थानकात उतरल्यावर रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. मानसरोवर स्थानकातील रेल्वे पोलिसांनी बॅगेचा शोध घेऊन ती महिलेला परत केली.






