। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचे बंड अखेर थंड झालं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी बागुल यांची इच्छा होती. त्यामुळे रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्याने ते नाराज झाले होते. यासाठी त्यांनी काँग्रेस भवनात उपोषणही केले होेते. पण आता त्यांनी आपल्या भूमिकेवरुन युटर्न घेतला आहे.
आमची नाराजी नव्हती, आम्ही काँग्रेसचेच आहोत, निष्ठावान आहोत. आम्ही पक्षश्रेष्ठींपर्यंत आमचे म्हणणे मांडत होतो. आमचे म्हणणे ऐकून घ्या, आमच्यातही काहीतरी क्वालिटी आहे. हेच आम्ही त्यांना सांगत होतो, असं आबा बागुल यांनी सांगितले.