। माणगाव । प्रतिनिधी ।
कोकण मराठी साहित्य परिषद तळा शाखेतर्फे गुरुवारी (दि.29) अॅड. परेश जाधव यांच्या इंदापूर येथील निवासस्थानी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीनिमित्ताने मराठी भाषा गौरव दिन बहारदार कवीसंमेलनाने अतिशय उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी पुरुषोत्तम मुळे, सुधीर शेठ अ.वि.जंगम, संजय गुंजाळ, अजित शेडगे, गंगाधर साळवी, संध्या दिवकर, सिध्देश लखमदे, अॅड.परेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. अजित भोपी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी हे अभिमान गीत उत्कृष्ट सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. भरत जोशी यांनी पोवाडा सादर करुन मराठी भाषेचा गौरव केला. पुरुषोत्तम मुळे यांनीही मार्गदर्शन केले व आपल्या खड्या आवाजात चमके शिवबाची तलवार हे गीत सादर केले. कवीसंमेलनात गंगाधर साळवी, सिध्देश लखमदे, अजित शेडगे, परेश जाधव, संध्या दिवकर, मानसी चापेकर, विजय दिवकर, स्वराज दिवकर, अपूर्वा जंगम, संगिता सुरशेट्टे, बाळकृष्ण मेथा, बाबाजी धोत्रे, जयंत देशपांडे, डॉ.शितल मालुसरे, वंदन सापळे, नागेश नायडू, शब्बीर हज्जू, गणेश साळवी, बाबूराव कांबळे, आशिष पाटील, चेतन बारस्कर, पुष्पा चांदवले या कवींनी आपल्या वेगवेगळ्या विषयावरील बहारदार रचना सादर करुन रसिकांना चिंब केले.