| मुंबई | प्रतिनिधी |
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. तसेच सत्र न्यायालयाने 2024 मध्ये सुनावलेली जन्मठेपेची शिक्षाही स्थगित केली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने अंदुरेचा अंतरिम अर्ज मंजूर केला. अंदुरेने दोषसिद्धीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 10 मे 2024 रोजी सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनीही तीन आरोपींच्या निर्दोष मुक्ततेसह यूएपीएअंतर्गत आरोप रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन
