बजरंग पुनिया जागतिक कुस्तीच्या स्पर्धेबाहेर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आगामी कुस्ती विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेबाहेर पडला आहे. पुनियाला टोक्यो क्रीडा स्पर्धेतनंतर लिगामेंट टीअर उपचार करण्यासाठी सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप 2 ते 10 ऑक्टोबर दरम्यान ओस्लो, नॉर्वे येथे आयोजित केली जाईल आणि प्रकृती पुन्हा नीट होईपर्यंत बजरंग प्रशिक्षण सुरू करू शकणार नाही.

बजरंगने अलीकडेच एमआरआय केले होते आणि ऑलिम्पिकच्या आधी जूनमध्ये रशियामध्ये झालेल्या दुखापतीची तीव्रता जाणून घेण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स मेडिसिन सेंटरचे प्रमुख डॉ. दिनशॉ पारदिवाला यांचा सल्ला घेतला होता. बजरंग यांनी पीटीआयला सांगितले की, लिगामेंट मध्ये इजा झाली आहे आणि डॉ. दिनशॉ यांनी मला सहा आठवडे प्रकृती पुन्हा नीट होईपर्यंत आराम करण्यास सांगितले आहे. मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

Exit mobile version