बालाजी ज्वेलर्स दुकान फोडून चार लाखांचा ऐवज लंपास

| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील बालाजी ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरट्याने फोडून सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 4 लाख 58 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन फरार झाला आहे. सदरचा गुन्हा शुक्रवार, दि.29 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 ते शनिवार, दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडला. याबाबतची फिर्याद सोहनलाल बुराराम चौधरी (42) रा. इंदापूर, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक श्रीमती जाधव या करीत आहेत.

Exit mobile version