बाळाराम पाटील यांनी शिक्षकहिताला प्राधान्य दिले

अ‍ॅड. निलीमा पाटील यांचे प्रतिपादन
| पेण | प्रतिनिधी |
आ. बाळाराम पाटील यांनी नेहमीच शिक्षकहिताला प्राधान्य दिले आहे. या व्यक्तीने फक्त शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचा विचार न करता शिक्षकांच्या भवितव्याचा विचार करुन त्यांच्या शिक्षणासाठी शासनाने 50 टक्के मदत करावी यासाठी विधिमंडळात आवाज उठवला आहे. अशा उमेदवाराला पुन्हा एकदा बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन माजी जि.प. अध्यक्षा निलीमा पाटील यांनी केले. महाविकास आघाडीचे कोकण शिक्षक मतदार संघातील उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी पेण शहरातील शिक्षक मतदारांशी संवाद साधला.

त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पेण तालुक्यातील कार्यकर्ते हजर होते. यामध्ये काँग्रेसकडून अशोक मोकल, शिवसेनेचे जगदीश ठाकूर, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख दयानंद भगत, नरेश ठाकूर, शेकापचे जिल्हा परिषद सदस्य डी.बी. पाटील, मा. उपनगराध्यक्ष प्रकाश शिंगरूत, नगरसेवक शोमेर पेणकर, नगरसेविका ममता पाटील, नगरसेविका सुनिता जोशी, नगरसेवक संतोष पाटील, नरेंद्र पाटील, निलकंठ पनवेलचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे पाटील यांनी सांगितले की, आजपर्यंतच्या शिक्षक आमदारांची काम करण्याची पद्धत पाहता आणि आ. बाळाराम पाटील यांची काम करण्याची पद्धत पाहता आपल्याला नक्की फरक जाणवेल. या व्यक्तीने फक्त शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचा विचार न करता शिक्षकांच्या मुलांच्या विचारदेखील आ. बाळाराम पाटील यांनी करून शिक्षकांच्या मुलांच्या भविष्याच्या शिक्षणाला शासनाने 50 टक्के मदत करावी यासाठी विधिमंडळात आवाज उठवला. शाळासाठी शैक्षणिक साहित्य संगणक, प्रिंटर अशा वस्तू देऊन आपल्या निधीचा सदुपयोग केला. सर्व शिक्षक आमदारांना एकत्र आणण्याचे काम केले. जे आजपर्यंत कुणालाही जमले नव्हते, ते करून दाखवले. पक्ष कोणताही असला सगळे शिक्षक आमदार शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी एकत्र येऊन आमदार बाळाराम पाटील यांच्यामुळेच भांडले. तसेच आ. बाळाराम पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील समस्या काय आहेत त्याची उकल कशी करायची याबाबत पूर्ण ज्ञान असल्याने बाळाराम पाटील यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीला निवडून द्यावे ही अपेक्षा. आज दिवसभरात पेण शहरातील सर्व शाळांच्या शिक्षकांना भेटून आमदार बाळाराम यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Exit mobile version