बळी सेना, कुणबी एकीकरण समिती लोकसभेच्या रिंगणात

राज्यभरात अकरा जागा लढविणार असल्याची घोषणा

| माणगाव | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीचे बिगुल नुकतेच वाजले आहे. देशात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील 11 जागा बळी सेना व कुणबी एकीकरण समिती-महाराष्ट्र राज्य माध्यमातून लढविणार असल्याचे पक्षाध्यक्ष अशोक वालम यांनी गुरुवार, (दि.21) मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. या बैठकीला ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत त्यांनी रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ, सांगली, नाशिक, उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, अशा एकूण 11 लोकसभेच्या जागांवर उमेदवार देणार असल्याचे सांगितले. त्यापैकी संघाध्यक्ष भूषण बरे-रायगड लोकसभा, राजाराम पाटील-मावळ, हभप गणेश डांगे- सांगली, धनंजय किनगावकर-नाशिक व श्रावण बाळा इंगळे- उत्तर मध्य मुंबई यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उर्वरित सहा उमेदवार लवकरच जाहीर करु असे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version