| पाताळगंगा | प्रतिनिधी |
श्रावण महिन्याचे आगमन झाल्यापासून बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे बळीराजा श्रावण महिन्यातसुद्धा शेतीच्या कामाकडे व्यस्त असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. वर्षभर शेतात राबणारा बळीराजा महिन्यात ठराविक असे दिवस शेतातील काम बंद ठेऊन वार पाळून अध्यात्म करीत असतो. मात्र, शेतातील कामात व्यस्त असल्यांचे दृश्य सध्या अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.
श्रावण महिन्यात देव देवतांच्या विविध मंदिरामध्ये टाळ, मृदंगाचा गजर ऐकू येत असतो. त्याच बरोबर भजन, प्रवचन व कीर्तन असे अध्यात्मिक कार्यक्रमही सुरू असतात. परंतु, वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे असून, ऊन-पाऊस याची तमा न बाळगता ही परंपरा फार वर्षापासूनची आहे. पीक – पाणी चांगले बहरून यावे, सृदृढ आरोग्यप्राप्ती लाभावी, मानसिक व अध्यात्मिक विकास व्हावा, यासाठीच बळीराजा वार पाळून श्रावण मासात अध्यात्म करताना दिसत आहे. या दिवशीही शेतकरी बैल जोडिविना शेतात काम करतात. काही सणा दिवशीही शेतकरी शेतीच्या कामात मग्न असलेले चित्र पाहावयास मिळत आहे. रोज शेतात जाणे, जनावरांना धुणे-पोसणे, चारा आणणे, चाऱ्याची साठवणूक करणे. शिवारात मशागत करणे, पिकांची जोपासना करणे व धान्य साठवणूक करणे अशा कामाचे चक्र कायम सुरू असते.







