वरुणराजाच्या बरसण्याने बळीराजा सुखावला

। म्हसळा । वार्ताहर ।
जुलैपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने म्हसळा तालुक्यातील शेतीकामांना आता चांगलाच जोर आला आहे.यामुळे सर्वच शेतात बळीराजा शेतीच्या कामात मश्गुल झाल्याचे दिसत आहे.पावसाने मात्र बाजारपेठेत मंदीचे वातावरण दिसत आहेत. म्हसळा तालुक्यात आज पर्यंत 1094 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. चालू खरीपाचे हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला आसला तरी त्यानी मागील वर्षाची सरासरी गाठली आहे,गेल्या आठवड्यात 611 मि.मि.पावसामुळे खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे नद्या,ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत, पाऊस आधे- मधे उघडीप देत आसल्यामुळे बळीराजा लावणीच्या ,आणि तालुक्यातील फळबागायतदार आंबा-काजूच्या आणि अन्य बागायतींच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे.

तालुक्यात भात 2400 हेक्टर, नागली 400 हेक्टर,वरीचे 100 हेक्टर क्षेत्रांत पिक घेतले जाते, तर फळबागायती मध्ये आंबा 2400 हे,काजू 700 हे. सुपारी 60 हे.क्षेत्रांत पिक घेतले जाते,भात शेतींत घरा-घरांतील सर्व मंडळी लावणीच्या कामात गुंतली आहेत. आंबा फळबागायतींना रिंगा काढून खत देण्याचे मशागतीचे काम सुरू झाले आहे. सुपारीचे पिकाला फवारणीचा कालावधी सुरु आहे. तालुक्यातील सर्व क्षेत्रांतील शेतकरी,फळबागायतदार शेतमजूर शेतांत गुंतल्यामुळे बाजारांतील ग्राहकांवर परिणाम झाला आहे.त्यामुळे बाजारांत मंदीचे सावट आल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

तालुक्यांत जंगली श्‍वापद ,माकड, वानर, केलटी यांचा प्रार्दुभाव, मजुरांची कमतरता यामुळे वनक्षेत्रांजवळील आणि अन्य भातशेती आर्थिक दृष्टया नुकसानीची होत आसल्याने शेत जमीन मोठया प्रमाणावर पडीक सोडण्याकडे शेतकरी वर्गाचा कल आहे, कृषी आणि महसुल विभागाचे माध्यमांतून पिकाखाली क्षेत्राचे सर्वेक्षण व्हावे

मधुकर पाटील, मेंदडी.


शेती करताना सर्व मजूर विकत घेऊन शेती करायची झाल्यास खुल्या बाजारापेक्षा मजूर घेऊन पिकविलेले तांदूळ महाग पडतात. आज ग्रामीण भागांत नांगर रु 600ते 700, स्त्रिया (मजूर) रु200 ते 250, पुरुष रु 400 ते रु 500 आसल्याने शेती परवडत नाही.

दक्षता घोले शेतकरी घूम ता.म्हसळा.


Exit mobile version