घातक फटाक्यांवर बंदी : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
हानिकारक फटाक्यांवर बंदी असूनही त्यांची सर्रास विक्री होत असल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या तपास संस्था कशा आहेत, याबाबत भाष्य करीत न्या. एम.आर. शहा यांच्या पीठाने केंद्र व राज्य सरकारांना फटकारले.
आम्ही फक्त ग्रीन फटक्यांच्या विक्रीला मंजुरी दिली होती. मात्र, बाजारात सर्वच प्रकारच्या फटक्यांची विक्री होत आहे. कोर्ट म्हणाले, फटाक्यांवर 100 टक्के बंदी नाही. ती केवळ हानिकारक रसायनांपासून निर्मित फटक्यांवरच आहे. ग्रीन फटाक्यांवर नाही. आमच्या आदेश कठोरपणे पालन केले जावे. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली.
न्या. शहा म्हणाले, फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दरवर्षी दिल्लीचे काय हाल होतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. व्यापक जनहितार्थ फटाक्यांवर बंदी आणली आहे. ही विशिष्ट समुदायाविरुद्ध असल्याची धारणा काही लोक बनवत आहे. तसे नसल्याचे आम्ही स्पष्ट करत आहोत. आपला आनंद घेण्यासाठी कुणाच्या आयुष्याचा खेळ करता येणार नाही. आम्ही येथे मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आहोत.

Exit mobile version