रंगसंगतीमुळे वांगणी रेल्वे स्थानक आकर्षक

| नेरळ । वार्ताहर ।
मध्यरेल्वेवरील वांगणी रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल नव्या पद्धतीने बनविण्यात आल्याने अधिक आकर्षक वाटत आहे. या रेल्वे स्थानकात नव्याने बांधण्यात आलेल्या लांबसडक पुलावर पायर्‍यांना आकर्षक रंगसंगती करण्यात आली आहे. या पादचारी पुलावर करण्यात आलेल्या रंगसंगती यामुळे या पादचारी पुलावरून प्रवाशांची सुरु झाली आहे. वांगणी रेल्वे स्थानक ठाणे जिल्ह्यातील शेवटचे रेल्वे स्थानक असून मुंबईचे उपनगर म्हणून वांगणी रेल्वे स्थानक परिसर विकसित होत आहे.

या भागात अनेक गृह निर्माण प्रकल्प आले असून या भागात उपनगरीय लोकलने मुंबई येथून येणार्‍या प्रवासी यांची संख्या वाढली आहे. मागील काही वर्षात स्थानकाच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे वांगणी रेल्वे स्थानकात असलेला मुंबई एण्डकडील एकमेव पादचारी पूल अपुरा पडू लागला होता.हा पादचारी पूल अपुरा पडत असल्याने स्थानकात उतरणारे प्रवासी हे रेल्वे मार्गावर उड्या मारून घराकडे जात असतात.त्यामुळे अपघात सातत्याने होत असतात. दुसरीकडे वांगणी रेल्वे स्थानकात बदलापूर पर्यंत आलेल्या उपनगरीय लोकल रात्रीच्या वेळी आणल्या जातात. त्यामुळे रूळ ओलांडून घराकडे जाणार्‍या प्रवाशांची तारांबळ उडू लागली आहे.

पुलाच्या पायर्‍यांवर आकर्षक अशी रंगांनी सजवले आहे. त्यामुळे पुलावरून चालताना देखील प्रवासी खुश असल्याचे दिसून येत आहेत. मात्र प्रवासी आज देखील पुलाच्या निर्मिती नंतर पादचारी पुलाचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. रूळ ओलांडून जाणारी प्रवाशांची संख्या अधिक असल्याने पादचारी पुलावरून जाण्याची सक्ती करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आक्रमक भूमिका घेण्याची गरज प्रवासी यांच्याकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version