आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशचा घात

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळवण्यात आला. यासामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 4 धावांनी पराभव केला. मात्र, सामना संपताच वादालाही सुरुवात झाली. बांगलादेशच्या पराभवात आयसीसीच्या नियमांचा मोठा वाटा असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे.

आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशने हा सामना गमावला. हा नियम नसता तर सामना टाय झाला असता आणि नंतर सुपर ओव्हर खेळावी लागली असती. खरंतर, 17 व्या षटकाचा दुसरा चेंडू महमुदुल्लाहच्या पॅडला लागल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर गेला. दक्षिण आफ्रिकेने अपील केले आणि अंपायरने आऊट दिला. महमुदुल्लाहने डीआरएस घेतला आणि तो नाबाद राहिला. पण त्यानंतरही त्याला ही चौकार दिला नाही.

Exit mobile version