पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा उच्छाद

तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!

। पिंपरी । वृत्तसंस्था ।

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून अनधिकृत राहत असलेल्या बांगलादेशींकडून बनावट कागदपत्राच्या आधारे मिळवलेले तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील दहशतवाद विरोधी पथक आणि निगडी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत जानेवारी महिन्यात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनाधिकृतरित्या वास्तव्य करत असणार्‍या 5 बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती मिळाली होती.

यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्या 5 बांगलादेशी नागरिकांना ज्या एजंटने पासपोर्ट बनवण्यासाठी मदत केली त्याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात आली. यामध्ये त्या एजंटने आणखी 35 बांगलादेशी घुसखोरांना भारतीय पासपोर्ट मिळवून दिला असल्याचं समोर आलं आहे. संबंधित एजंटसह सर्व 42 बांगलादेशी घुसखोरांविरोधात जानेवारी महिन्यात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शोध घेतला असता त्या 5 बांगलादेशी नागरिकांना एका एजंटने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट बनवून दिला असल्याचे पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथक, निगडी पोलीस पासपोर्ट विभाग यांच्या संयुक्त कारवाईमध्ये ज्या एजंटकडून हे पासपोर्ट बनवले गेले ते 42 पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.

हे घुसखोर भारत-बांगलादेश बॉर्डरवरून भारतात प्रवेश केल्यानंतर ते त्या ठिकाणी असणार्‍या बॉर्डरवर असणार्‍या जिल्ह्यातील बनावट शाळा सोडल्याचा दाखला, डोमीसाईल इत्यादी कागदपत्रे बनवत आणि त्या कागदपत्राच्या आधारे ओरिजनल आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेत आणि त्यानंतर ते घुसखोर या ओरिजनल आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारावर पासपोर्ट बनवून घेत होते.

Exit mobile version