| पनवेल | वार्ताहर |
मागील सहा महिन्यापासून मोठा खांदा गावात अवैध वास्तव्य करुन राहणार्या एका 30 वर्षीय बांगलादेशी तरुणाला कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद इफ्तिकार मोल्ला असे या तरुणाचे नाव आहे.
मोठा खांदा गावातील एका खोलीत मोहम्मद मोल्ला हा राहत होता. बांधकाम मजुरीचे काम करणारा मोहम्मद हा बांगलादेशी असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राकेश पगारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस शिपाई राजेंद्र इलग यांच्यासोबत जाऊन मोहम्मदला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील कागदपत्रांची पडताळणी केल्यावर मोहम्मद हा बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील लष्करपूर गावचा असल्याचे समोर आले. कामोठे पोलीस ठाण्यात मोहम्मद याच्याविरोधात पारपत्र अधिनियम अंतर्गत पोलिसांनी मोहम्मद याला अटक केली आहे.