टी-20 मालिका जिंकण्याचे बांगलादेशचे स्वप्न अधुरे

किवी संघाने विजय मिळवत वर्षाचा शेवट केला गोड

। माउंट मौनगानुई । वृत्तसंस्था ।

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (31 डिसेंबर) खेळला गेला. वर्षाच्या शेवटच्या दिवशी, किवी संघाने माउंट मौनगानुई येथे पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात विजय मिळवला. त्यांनी डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून 17 धावांनी सामना जिंकला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका बरोबरीत सोडवली. पहिला सामना बांगलादेशने जिंकला तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला.न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा संघ 19.2 षटकात 110 धावांवर गारद झाला. त्यांच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही. कर्णधार नझमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 17 धावा केल्या. तौहीदने 16, अफिफ हुसेनने 14, रिशाद हुसेन आणि रॉनी तालुकदारने प्रत्येकी 10-10 धावा केल्या. शमीम हुसेन 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि तनवीर इस्लामने 8 धावा केल्या. सौम्या सरकार आणि मेहदी हसन यांना प्रत्येकी चारच धावा करता आल्या.सँटनरची जबरदस्त गोलंदाजीमाउंट मौनगानुईमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. टीम साऊदी, बेन सियर्स आणि अ‍ॅडम मिल्ने यांनी सुरुवातीला प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याच्या पाठोपाठ गोलंदाजीला आलेल्या कर्णधार सँटनरने अप्रतिम गोलंदाजी केली त्याने तब्बल चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने चार षटकात केवळ 16 धावा दिल्या. साउदी, सियर्स आणि मिल्ने यांनाही शेवटी प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळवले.

Exit mobile version