बँक शिपायाचा खून पैशाच्या वादातून; एकाला अटक तर दुसरा फरार

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
येथील युनियन बँकेच्या शिपायाची हत्या करणारा पोलिसांच्या ताब्यात असून अन्य एक साथीदार फरार आहे. सदर हत्या ही पैशाच्या देवघेवी वरून झाल्याचे समोर आले आहे. दोन आरोपींमध्ये एक मयताच्या मेव्हणा आहे. विशेष म्हणजे नथुराम राठोड याची हत्या केल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी हे दोघेही मयताच्या पत्नीसोबत फिरत होते. तसेच पोलिस ठाण्यात येऊन अजून कसा शोध लागत नाही म्हणून जाब देखील विचारण्याची हिंमत केली होती.


अलिबाग येथील युनियन बँकेसह अनेक इमारतींमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणार्‍यानथुराम रुपसिंग राठोड याची हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह पालव स्मशानभुमी येथे आढळून आला होता. यानंतर खळबळ उडाली होती. या हत्येचा तपास अलिबाग पोलीस करत असताना अनेक आर्थिक घडामोडी समोर आल्या. नथूराम याने एका निलेश पवार या नातेवाईकाला बँकेत नोकरी लावण्यासाठी त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेतले होते. त्याप्रमाणे कामदेखील मिळवून दिले. निलेश सफाई कामगार म्हणून बँकेत काम करु लागला. त्याला 6 हजार रुपये पगार नथूराम देत असे. मात्र बँकने नाही तर नथुरामने त्याच्या जागी निलेश साफसफाईचे काम करणार असल्याचे बँकेला सांगून ठेवले होते. ही बाब महिन्यानंतर निलेश याला आपली फसवणूक झाल्याचे कळून चुकले होते. त्याने पैसे परत मागण्यास सुरुवात केली.

याच पैशाच्या वादातून नथुराम याची पालव स्मशानभूमीजवळ नेऊन हत्या करण्यात आली. हत्येनंतर निलेश हा त्याच्या नातेवाईकांसोबत खोटा खोटा शोक व्यक्त करत होता. शेवटी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत, नथुरामची हत्या केल्याचे कबुल केले. त्याचा आणखी एक नातेवाईक साथीदाराचा शोध सुरु आहे. निलेश याला अलिबाग न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीआय, जाधव, सुनील फड अनिकेत म्हात्रे करीत आहेत.

Exit mobile version