नेणवली शाळेत बँक आपल्या भेटीला उपक्रम

शाखा-पाली मार्फत मुलांना मार्गदर्शन

| पाली /बेणसे | वार्ताहर |

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा नेणवली येथे बँक आपल्या भेटीला हा उपक्रम बुधवारी (दि.24) संपन्न झाला. यांतर्गत बँक शाखा पाली सुधागडचे बँक व्यवस्थापक संजय नाईक व त्यांच्या टीमने नेणवली शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

नाईक यांनी मुलांना छोट्या गोष्टी व प्रश्‍न संवाद साधून बचतीचे महत्व समजावून सांगितले, त्याच बरोबर बँक कशासाठी असते, बचत कशी करावी, खाते कसे काढावे, कसे असते त्याच वापर, ऑनलाईन बँक खाते कसे कार्य करते, व्याज कसे मिळते ते व्याज कोण देते. आपली रक्कम कशी सुरक्षित असते आणि आपण खाती का बँकेत काढावी ह्या बाबत प्रत्यक्ष पावती व पावती चेकबुक दाखवून मुलांना मार्गदर्शन केले. मुलांनी सुद्धा बँक बाबत प्रश्‍न विचारून नफा तोटा, व्याज तसेच बँकेत नियुक्ती कशी होते, त्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक ह्याबाबत तज्ञाशी चर्चा केली. कार्यक्रमाचे स्वागत व आभार मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी मानले.


इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणात बँक, नेटबँकिंग, बचत व गुंतवणूक ह्याची जाणीव व मार्गदर्शन मिळावे हा ह्या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.

राजेंद्र अंबिके,
मुख्याध्यापक, नेणवली
Exit mobile version