मार्च महिन्यात 14 दिवस बँका बंद

| रायगड | खास प्रतिनिधी |

मार्च 2024 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. या दिवशी बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होणार आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमधील सर्व रविवार, दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने 1, 8, 22, 25, 26, 27 आणि 29 मार्च रोजी बँकांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मार्चमध्ये 5 रविवार येतात म्हणजेच 3, 10, 17, 24 आणि 31 मार्च रोजी बँकांमध्ये नियमित सुट्ट्या असतील. महाराष्ट्रात महाशिवरात्री, होळी, गुड फ्रायडे या निमित्त बँकांना सुट्टी असेल, याशिवाय सर्व रविवार, दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. काही प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे. मार्च महिन्यात होळीचा सण आहे. 25 मार्चला होळीनिमित्त देशभरात सार्वजनिक सुट्टी असेल. देशभरातील सर्व राज्यांमध्ये विविध सणांच्या दिवशी सुट्ट्या असतात आणि स्थानिक सणांनुसार बँका बंद राहतात.

Exit mobile version