पांड्यावर एका मॅचसाठी बंदी

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईचा यंदाच्या आयपीएलमधील दहावा पराभव लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध झाला. लखनौ सुपर जाएंटसने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 गडी गमावत 214 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई 6 गडी गमावत 196 धावांपर्यंत मजल मारली. या मॅचदरम्यान स्लो ओव्हर रेट प्रकरणी बीसीसीआयने हार्दिक पांड्या आणि मुंबईच्या इतर खेळाडूंवर कारवाई केली आहे.

यावेळी हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी घालत बीसीसीआयने 30 लाख रुपयांचा दंडही आकारला आहे. मुंबईकडून तिसऱ्यांदा अशा प्रकारची चूक झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय संघातील खेळाडूंना ज्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा देखील समावेश असेल त्यांनी 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के रक्कम जी कमी असेल ती भरावी लागणार आहे. जरी हार्दिक पांड्या पुढच्या हंगामात दुसऱ्या संघाकडून खेळला तरी त्याच्यावर ही बंदी कायम राहणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा मुंबईला स्लो ओव्हर रेट प्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

Exit mobile version