प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू जप्त

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहरातील ठाणा नाका परिसरातील नवरतन पान शॉपमध्ये प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू व जर्द्याचा साठा करून विक्री केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सचिन आढाव यांच्या तक्रारीवरून सुरेश गुप्ता (47) व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणा नाका येथील सिटी वाईन्सलगत असलेल्या नवरतन पान शॉपमध्ये हा प्रकार आढळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत रजनीगंधा पानमसाला, तुळसी जर्दा, विमल पानमसाला, व्ही-1 तंबाखू, राजश्री पानमसाला आणि डबल ब्लॅक तंबाखू अशा विविध प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,981 रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version