| पनवेल | प्रतिनिधी |
मावळ लोकसभा निवडणुकी साठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे. 13 मे रोजी पार पडत असलेल्या या निवडणुकीत महायुतिकडून श्रीकांत बारणे यांना तिसर्यांदा संधी देण्यात आल्याने बारणे यांच्या समोर विजयासाठी गत वेळी मिळवलेली आघाडी टिकवण्याचे आव्हान आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासमोर बारणे यांची आघाडी तोडण्याचे मोठे आव्हान असल्याने आघाडी टिकवण्यासाठी आणि तोडण्यासाठी दोन्ही उमेदवारांना आपली ताकत पणाला लावावी लागणार आहे. 2019 साली पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत भाजप आणि शिव सेना महायुतीच्या उमेदवारासमोर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आणि कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे आव्हान होते.
महायुतीचे उमेदवार बारणे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस पक्षांकडून बारणे यांच्या समोर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आल्याने त्या वेळची निवडणूक अटीतटीची होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणुकी नंतर आलेल्या निकालात मावळ मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघा पैकी 5 विधानसभा मतदार संघातून बारणे यांनी मोठी आघाडी घेत पार्थ पवार यांना मागे टाकत विजय मिळवळ्याचे पाहायला मिळाले होते.
गणित बदलणार राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय उलथापालथी मुळे राज्यातील निवडणुकाणची गणित बदलली आहेत. मावळ लोकसभा मतदार संघ देखील याला अपवाद नसून,2019 मध्ये एक मेका विरोधात लढलेले शिव सेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष दुभंगले आहेत. दुभंगलेल्या दोन्ही पक्षातील 2019 चे विजयी आणि पराभूत उमेदवार भाजपा सोबत महायुती च्या माध्यमातून एकत्रित पणे निवडणूक लढत असल्याने दुभंगलेल्या पक्षातील किती मतदार मूळ पक्षातील उमेदवाराला मतदान करतात या वर युती आघाडीतील मतांचे आणि आघाडीचे गणित ठरणार आहे.
पनवेल श्रीरंग बारणे यांना 1 लाख 60 हजार 385 पार्थ पवार यांना 1 लाख 5 हजार 727 बारणे आघाडी 54 हजार 658 कर्जत श्रीरंग बारणे 83 हजार 996 पार्थ पवार 85 हजार 846 पार्थ आघाडी 1850 उरण श्रीरंग बारणे 89 हजार 587 पार्थ पवार 86 हजार 699 बारणे आघाडी 2888 मावळ श्रीरंग बारणे 1 लाख 5 हजार 272 पार्थ पवार 83 हजार 445 बारणे आघाडी 21 हजार 827 चिंचवड श्रीरंग बारणे 1 लाख 76 हजार 475 पार्थ पवार 79 हजार 717 बारणे आघाडी 96 हजार 758 पिंपरी श्रीरंग बारणे 1 लाख 3 हजार 235 पार्थ पवार 61 हजार 941 बारणे आघाडी 41 हजार 294 पोस्टल मतदान 3 हजार 357 श्रीरंग बारणे 1 हजार 713 पार्थ पवार 1 हजार 375 बारणे आघाड
2019 मधील मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण 22 लाख 97 हजार 405 मतदारांपैकी 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.विधानसभा निहाय मतदानाची आणि आघाडीची आकडेवारी!