शेलू स्थानकात लावलेले बॅरीगेट्स

। नेरळ । प्रतिनिधी ।

शेलू स्थानकावरील कर्जत दिशेकडील बाजूस रेल्वे प्रशासनाने लोखंडी बेरिगेट्स उभारल्या आहेत. त्यामुळे शेलू स्थानकातून बांधीवली गावाकडे जाणार्‍या लोकांना घरी परतणार अवघड झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिगेटस हटविण्याची मागणी माजी सरपंच शिवाजी खारीक यांनी केली आहे.

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील शेलू स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या कर्जत दिशेकडील असणार्‍या पादचारी पायर्‍या बंद करून तिथे रेल्वे प्रशासनाकडून लोखंडी बेरिगेट्स लावण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत माजी सरपंच शिवाजी खारीक आणि प्रवाशांनी हे बॅरीगेट हटवून जिन्याकडून येणारा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत मार्गांवर शेलू रेल्वे स्थानक आहे.या स्थानकावर दररोज सुमारे चार ते पाच हजार नागरिक प्रवास करत असतात. शेलू, बांधिवली, दामत, भडवल, तसेच निकोप मोहिली मानिवली अवसरे या गावातील चाकरमानी रोज शेलू स्थानाकावरून कामाच्या ठिकाणी जात असतात.शेलू स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या नेरळ दिशेकडील बाजूस रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जिना तयार करण्यात आला आहे.तसेच याच दिशेला लिफ्टदेखील तयार आहे. प्रवाशांनी जिना उतरल्यानंतर स्थानकामधून बाहेर पडण्यासाठी असणारा जुना रस्ता बंद करण्यात आला आहे.

Exit mobile version