। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल कळंबोली मधील उद्याने अमली पदार्थ ओढणार्यांचे अड्डे तयार झाले आहेत. पोलिसांनी या गर्दुल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कळंबोली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये मोहीद नावाचा एक तरुण गांजा सेवन करत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य व पुडील जा जप्त करण्यात आली. तसेच सेक्टर 2 मधील एलआयजी गार्डनमध्ये गस्तीवरील पोलिसांना एस. धायगुडे नावाचा तरुण गांजा ओढत असताना आढळून आला. त्याच्याकडे चिलीम व गांजाची पुडी आढळून आली. या दोन्ही आरोपींवर कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.