बॅटरी उत्पादकाची फसवणूक

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील पोशीर गावातील गाड्यांच्या बॅटरी विकण्याचा व्यवसाय असलेल्या तरुणाची ऑनलाईन वय व्यवहारात फसवणूक झाली आहे. आर्मीमध्ये नोकरी करीत असल्याचा बनाव करून आणि आपले गुगल पे खाते रिव्हर्स पे असल्याचे भासवून बॅटरी उत्पादकाला 95 हजाराला त्या तोतया आर्मी तरुणांनी चुना लावला आहे.


पोशीर येथील सुरेश हरिचंद्र काम्बरी यांचा विविध प्रकारच्या वाहनांच्या बॅटरी विकण्याचा आणि दुरुस्त करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या व्यवसायाची जाहिरात जस्ट डाऊलवर आठ महिन्यापूर्वी केली होती. त्याचा फायदा काम्बरी यांना आपला व्यवसाय वाढविण्यास झाला होता. 24 एप्रिल ते 5 मे या कालावधीत रोजी साहिल कुमार आणि ब्रिजॉय सिंग या दोन तरुणांनी सुरेश काम्बरी यांना फोन करून बॅटर्‍यांची ऑर्डर दिली. त्यावेळी या दोन्ही तरुणांनी आपण आर्मीमध्ये काम करीत असून बॅटर्‍यांचे झालेले बिल 94,995 रुपये गुगल पे करतो असे सांगून आपले गुगल पे अकाउंट हे रिव्हर्स पे अकाउंट असून तुम्ही आम्हाला 94,995 रुपये पाठवा आम्ही ते आणि झालेली बिल पे करू असे सांगितले. त्याप्रमाणे सुरेश काम्बरी यांनी साहिल कुमार यांच्या 8446894489 आणि 7381643863 या मोबाईल क्रमांकावर पैसे पाठवले. त्यानंतर सुरेश काम्बरी यांच्या दुकानातून ना बॅटरी खरेदी केली गेली आणि त्यांचे पैसे परत देखील परत आले नाहीत. त्यामुळे सुरेश काम्बरी यांचा विश्‍वासघात तसेच फसवणूक केल्याबद्दल नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.


पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर या घटनेचा अधिक तपास करीत असून साहिल कुमार तसेच ब्रिजॉय सिंग या तोतया आर्मी तरुणांवर गुन्हा दाखल झाला असून भादंवि कलम 419,420 आणि माहिती तंत्रज्ञन ऍक्ट 66 क, ड कलमानुसार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Exit mobile version