बावनकुळे भाजपेच नवे प्रदेशाध्यक्ष; शेलार मुंबईचे कारभारी

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

आशिष शेलार हे या आधीही मुंबईचे प्रदेशाध्यक्ष होते. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे. एकाच व्यक्तीकडे मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेतृत्व अनुकूल नव्हते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदावर वर्णी लागताच भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले. याच बावनकुळेंना या आधी विधानसभेचे तिकीट नाकारले होते. त्यानंतर आता त्यांना विधानपरिषद आमदारकी मिळाली आणि आता प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे.

Exit mobile version