। मुंबई । प्रतिनिधी ।
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला विरोध करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करत त्यावर निषेध व्यक्त केला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी मारकरवाडी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तीव्र टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, 100 शकुनी मेले तेव्हा शरद पवार जन्माला आले. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करत या टीकेला विरोध करत शरद पवार यांना मान्यवर नेते म्हणून सन्मान देण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शरद पवार हे एक अत्यंत सन्माननीय नेते आहेत आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अशा प्रकारच्या टीका भाजपला स्वीकार्य नाहीत. आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे. पण विचारधारेचा सन्मान केला पाहिजे. या प्रकारच्या टीका पक्षाच्या धोरणानुसार असू नयेत. पडळकर यांनी व्यक्तिगत टीका केली त्याची आम्ही दखल घेऊ. ही टीका आम्हाला मान्य नाही. पडळकर यांनी शरद पवार यांच्या बद्दल बोलणे हे योग्य नाही, असे देखील बावनुकळे म्हणाले.