आगामी निवडणुकांमुळे बीसीसीआयला टेन्शन?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपली असून, आता भारतात आयपीएल 2024 चं बिगुल वाजायला सुरूवात झाली आहे. मात्र, यंदाची आयपीएल भारतातच होणार की लोकसभा निवडणुकीमुळे ती विदेशात हलवावी लागणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. बीसीसीआय तर आयपीएल भारतातच खेळवण्याबाबत आग्रही आहे.

आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी 19 डिसेंबरला दुबईत मिनी लिलाव होणार आहे. मात्र, आयपीएलचं वेळापत्रक हे निवडणूक आयोगाच्या एका परिपत्रकावर अवलंबून असणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सील निवडणूक आयोगाच्या घोषणेची वाट पाहात आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतरच आयपीएल पूर्णपणे भारतात खेळवणे शक्य आहे की नाही हे स्पष्ट होईल.

आयपीएल आणि लोकसभा निवडणूक एकत्र होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2009, 2014 मध्येदेखील लोकसभा निवडणूक आणि आयपीएल एकत्र झालं होतं. त्यावेळी आयपीएल विदेशात हलवण्यात आलं होत. मात्र, 2019 चा आयपीएल हंगाम हा निवडणूक असूनही भारतातच खेळवण्यात आला होता.

आयपीएलचं संभाव्य वेळापत्रक
आयपीएल 2024 चं संभाव्य वेळापत्रक हे मार्च 24 ते मे 26 दरम्यान असण्याची शक्यता आहे. आयसीसी टी 20 वर्ल्डकप हा 4 जूनपासून वेस्ट इंडीज आणि अमेरिकेमध्ये सुरू होत असून, तो 30 जूनपर्यंत संपणार आहे. त्यामुळेदेखील आयपीएलचे वेळापत्रक तयार करणे अजूनच क्लिष्ट झालं आहे.

Exit mobile version