बीसीसीआय होणार मालामाल

आयसीसीच्या निव्वळ उत्पन्नातील मिळणार 40 टक्के वाटा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयसीसीच्या 2024 ते 27 या उत्पन्नाच्या सायकलमध्ये बीसीसीआयची मोठी हिस्सेदारी असणार आहे. आयसीसीला या सायकलमध्ये जवळपास 600 मिलियन वार्षिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातील 38.5 टक्के हिस्सा हा बीसीसीआयला मिळणार आहे. यामुळे जागतिक क्रिकेटमधील भारताचे भक्कम स्थान अजूनच अधोरेखित झाले आहे. बीसीसीआयला पुढील चार वर्षांच्या व्यावसायिक सायकलमध्ये आयसीसीच्या सरप्लस निव्वळ उत्पन्नातील जवळपास 40 टक्के वाटा मिळणार आहे. आयसीसीच्या या नवीन उत्पन्नाबाबतच्या मॉडेलची माहिती इएसपीएल क्रिकइन्फोने दिली आहे.

या प्रस्तावित आयसीसी उत्पन्नाच्या मॉडेलनुसार बीसीसीआय ही सर्वाधिक कमाई करणारा बोर्ड ठरणार आहे. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाला 41.33 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा 6.89 टक्के इतका वाटा मिळेल. तर आयसीसीच्या कामाईतील तिसरा सर्वात जास्त वाटा असलेली क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 37.53 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा 6.25 टक्के वाटा मिळणार आहे. याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 34.51 अमेरिकन डॉलर किंवा 5.75 टक्के वाटा मिळणार आहे. पाकिस्तान हे इतर 9 पूर्ण सदस्य क्रिकेट बोर्डापैकी एकमेव क्रिकेट संघटना आहे जिला 30 मिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त वाटा मिळणार आहे. इतर आठ पूर्णवेळ क्रिकेट बोर्डांना 5 टक्क्यांपेक्षा कमी वाटा मिळणार आहे. आयसीसीच्या एकूण निव्वळ उत्पन्नापैकी 88.81 टक्के वाटा हा 12 पूर्ण सदस्य असलेल्या क्रिकेट संघटनांना मिळणार आहे. तर असोसिएट सदस्यांना 11.19 टक्के वाटा मिळणार आहे. यातील वर्षाची एकूण रक्कम ही आयसीसीच्या कमाईवर अवलंबून आहे. ही जवळपास 3.2 बिलियन डॉलर अशू शकते. हे उत्पन्न फक्त माध्यम हक्काद्वारे मिळेल.

Exit mobile version