| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघ पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी सज्ज होत असून गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ अजिंक्यपद चषक जिंकेल, अशी सर्वांना आशा आहे. पण, या चषकासाठी पाकिस्तानात जाणार का, हा खरा प्रश्न असून त्याचे उत्तर आता मिळाले आहे.
पुढील वर्षी अंजिक्यपद चषक 2025 ची स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यासाठी तयारीही सुरूर केली आहे. त्यांनी आयसीसीकडे वेळापत्रकाचा ड्राफ्टही पाठवला आहे. त्यानुसार भारतीय संघाचे सर्व सामने त्यांनी लाहोर येथे खेळवण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. भारती विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील लढत 1 मार्च रोजी होणार असल्याचे वृत्त आहे. परंतु, भारतीय संघ अजिंक्यपद चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. दोन्ही देशांतील राजकीय संबंध पाहता भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही आणि त्यामुळे बीसीसीआयने त्यांचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवण्याचा प्रस्ताव आयसीसीला दिला आहे. बीसीसीआयचे क्रिकेटमधील वर्चस्व पाहता हा प्रस्ताव मान्य केला जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचा पाकिस्तानात जाण्यास नकार
