| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हेटवणेे धरण 100 टक्के भरून ओव्हरफ्लो होत असल्याने या धरणाचे 6 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नदीकिनारी व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पेण तालुक्यातून नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या हेटवणे पूर्णतः भरले आहे. या धरणाची एकूण क्षमता 147 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मागील काही दिवसांपासून पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचेे 6 दरवाजे उघडले आहे. त्यातुन 185.53 घन मिटर लिटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे.
धरण पाणी पातळी 84.60 मी. सांडव्यावरिल सहा दरवाजे उघडले आहेत. परिणामी, भोगेश्वरी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज आणि पाणलोटातील पावसाच्या तीव्रतेनुसार पुढील महिती दिली जाईल.