। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशात सलग दुसऱ्या दिवशी २४ तासात दोन हजारापेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी देशात २ हजार ३८० नवे रुग्ण आढळले असून १ हजार २३१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला १३ हजार ४३३ रुग्ण आहेत. याआधी बुधवारी देशात २ हजार ६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी १ हजार २४७ रुग्ण आढळले असताना बुधवारी झालेली ही वाढ मोठी होती.
सरकारी डेटानुसार, गुरुवारी सकाळी पॉझिटिव्हिटी रेट ०.५३ टक्के आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट ०.४३ टक्क्यांवर आहे. गेल्या २४ तासात देशात जवळपास ४ लाख ५० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात सध्याच्या घडीला १८७ कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत.







