पाकिस्तानकडून हराल तर खबरदार..

अनिल कुंबळेंचा भारतीय संघाला इशारा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ एकवेळ केनियाकडून हरला तरी हरकत नाही, पण संघाने पाकिस्तानकडून कदापि पराभूत होऊ नये, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाला दिलेला आहे. भारत येत्या दोन महिन्यांत आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध अनेक सामने खेळणार आहे. तत्पूर्वी डावखुला गोलंदाज अनिल कुंबळेने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, या सामन्याला इतर कोणत्याही क्रिकेट सामन्याप्रमाणे घ्यावे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान संघाकडून एकदाही पराभूत झालेला नाही हे लक्षात ठेवावे असे तो म्हणाला.

आमच्या काळात म्हणले जात होते एकवेळ केनियाकडून हारा पण पाकिस्तानकडून नाही. त्यामुळे खेळाडूंवर दडपण आणि अपेक्षा दोन्ही जास्त होत्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने असेच खेळले जात आहेत आणि मुख्य म्हणजे तो फक्त इतर सामन्याप्रमाणे घेतला जावा.

अनिल कुंबळे, माजी क्रिकेटर

कुंबळेचे रेकार्डब्रेक
भारताच्या माजी कर्णधार असलेल्या अनिल कुंबळेचे पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने 15 कसोटींमध्ये 81 बळी घेतले आहेत. 1999 मध्ये नवी दिल्ली येथे एका डावात सर्व 10 बळी (74 धावांत 10) घेतल्या होत्या. कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध 34 एकदिवसीय सामन्यांमध्ये 54 बळी घेतले होते.

पिचसाइडफ लाँच कार्यक्रमादरम्यान अनिल कुंबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सय्यद किरमाणी हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. भारत आणि पाकिस्तानचे संघ पुढील दोन महिन्यात आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध अनेक सामने खेळणार आहेत. 2 सप्टेंबरला आशिया चषक 2023 मध्ये दोन्ही संघ भिडणार आहेत. यानंतर ते 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 मध्ये आमनेसामने असतील. मात्र, हा भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान संघाकडून एकदाही पराभूत झालेला नाही. दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले असून सातही वेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे. भारत आणि पाकिस्तानचा संघ शेवटचा सामना 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात झाला होता, जिथे भारतीय संघाने पाकिस्तानला एकतर्फी हरवले होते.

Exit mobile version